in ,

राज्यात मंत्र्यांपासून महिला सुरक्षित नाहीत, अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

लोकशाही न्यूज नेटवर्क | पुण्यात 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आता बड्या नेत्याचे नाव समोर येत आहे. या संदर्भातले ऑडीओ क्लिपही व्हायरल झाले आहेत. या प्रकरणावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात मंत्र्यांवरच बलात्काराची तक्रार होतेय, कोणी मुले पळवून नेतय तर कोणी मंत्र्यांच्या संबंधांमुळे महिला आत्महत्या करत आहे. त्यामुळे राज्यामध्ये मंत्र्यांपासून महिला सुरक्षित नसल्याची टीका अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

भातखळकर यांनी पुढे, मुख्यमंत्र्यांनी एका मंत्र्याची दबंगगिरी सहन केली त्याच्यावर ते चुपचाप राहिले असल्याचा चिमटाही काढला. तसेच आता आपल्याच पक्षाच्या मंत्र्याच्या प्रकरणात सुद्धा हि दादागिरी कि राठोडगिरी तुम्ही सहन करणार का असा सवाल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून केली आहे.

प्रकरण काय ?
मुळची परळीची असलेली 22 वर्षाची तरुणी पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. दरम्यान हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मूत्यू झाला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारत आणि चीन सीमावादावर समेट ; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला राज्य सरकारकडून परवानगी नाकारली