in

बंगळुरुत पार्टी पडली महागात… एकाच सोसायटीत १०० हून अधिक ‘कोरोना पॉझिटिव्ह’

देशभरात पुन्हा कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोना आणखी डोकं वर काढण्याची शक्यता आहे. यातच बंगळुरूतील एका बहुमजली इमारतीत शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील अनेकांनी एका पार्टीला हजेरी लावली होती.
बिल्डिंगमधले जवळपास ४५ जण एका पार्टीला उपस्थित होते. त्यांच्यामुळे एकाच सोसायटीतील शंभरहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज लेक व्ह्यू अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी सहा फेब्रुवारीला पार्टी आयोजित केली होती. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. यामध्ये ड्रायव्हर घरकाम करणारे कर्मचारी,आचारी यांचा समावेश आहे.

कॉम्पलेक्सच्या ४३५ फ्लॅटमध्ये १५०० रहिवाशी राहतात. सहा फेब्रुवारीला जवळपास ५०० रहिवाशी कार्यक्रमासाठी कॉम्पलेक्समध्ये एकत्र जमले होते, असे बीबीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महापालिका निवडणुकीआधी बविआला धक्का; पंकज देशमुखांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपाचा दावा सुप्रीम कोर्टाने फेटाळला