in

अमरावतीत १०० दलितांचा गाव सोडून तलावाजवळ आश्रय; तातडीने कारवाईचे जिल्हा प्रशासनाला आदेश

सूरज दाहाट, अमरावती | अमरावतीत दाणापूर गावातील सवर्णांनी अत्याचार होत असल्याने कंटाळून १०० दलितांनी गाव सोडून पाझर तलावाजवळ आश्रय घेतल्याची घटना घडली होती. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक फासणाऱ्या या घटनेची चर्चा राज्यात पसरली होती. या घटनेची दखल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेतली आहे.

दाणापूर गावातील सवर्णांनी अनुसूचित जातीच्या लोकांच्या शेतीचा वहीवाटीचा रस्ता अडवून एका वृद्ध शेतकरी महिलेची सोयाबीन गंजी पेटवून दिली होती व सतत येथील सवर्णांकडून अत्याचार होत असल्याने कंटाळून गावातील १०० दलितांनी गाव सोडून पाझर तलावाजवळ आश्रय घेतला होता. तर या घटनेची दखल थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेतली आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा पोलीस निरीक्षक अविनाश बारगळ यांनी दाणापूर गावात जाऊन पीडितांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. यात तातडीने घटनेची सर्व सखोल चौकशी करून अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला सादर करण्याचे निर्देश आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिले. तर यातील २ आरोपींना अटक केली असून पीडित कुटुंबाना तातडीने नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आली आहे अशी माहिती अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिली तर गावात सलोख्याचे वातावरण रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

घराचं स्वप्न पुर्ण होणार! ‘ही’ बँक देणार स्वस्तात गृहकर्ज

‘111 कोटी, 437 कोटी आले, हे गेले कुठे’; मनसे आमदाराचा सत्ताधारी शिवसेनेला सवाल