in

10th and 12th exam ; नियोजित वेळेत परीक्षा देऊ न शकणाऱ्यांची जूनमध्ये विशेष परीक्षा

कोरोना संसर्गामुळे 10वी, 12 वीचे जे विद्यार्थी नियोजित वेळेत परीक्षा देऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय.

10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. तर 12 वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे यादरम्यान होईल. या परीक्षेला विद्यार्थी बसू शकला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्याच्या घरात किंवा परिसरात कोरोना रुग्ण असतील, तसंच तो राहत असलेला विभाग सील केला असेल, अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्यांची जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : प्रियंकाविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबईत NCB ची मोठी कारवाई 2 कोटींचे ड्रग्ज जप्त