in

10th Exam | दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका मागे

महाराष्ट्रातील दहावीची परीक्षा (SSC Exam) रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका मागे घेण्यात आली आहे. पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप असेल तर तुम्ही नव्याने याचिका दाखल करु शकता, अशी मुभा न्यायालयाने दिली आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, आगामी मान्सून आणि सध्या कोरोनाचा संपूर्ण प्रशासनावर असलेला ताण यामुळे यंदा दहावीची परीक्षा न घेण्याची प्रमुख कारणं असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतल्या गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे सध्याच्या काळात राज्यात दहावीची परीक्षा घेणं शक्य नाही, असं उत्तर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टात सादर केलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, ‘कोरोनिल’वरुन कोर्टानं बजावले समन्स

‘प्रिय भक्तांनो’… प्रकाश राज यांचा मोदी समर्थकांना टोला