in , ,

‘111 कोटी, 437 कोटी आले, हे गेले कुठे’; मनसे आमदाराचा सत्ताधारी शिवसेनेला सवाल

सुरेश काटे | निवडणुका आल्या की बॅनर लागतात,111 कोटी आले 437 कोटी आले. हे कोटी गेले कुठे, रस्ते कुठे आहेत, असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित करत सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी आज कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांसमोर रस्ते व पाण्याबाबतच्या समस्या मांडत सूचना केल्या. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं. निवडणुका आल्या की बॅनर लागतात,111 कोटी आले 437 कोटी आले. हे कोटी गेले कुठे, रस्ते कुठे आहेत. असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे. एमआयडीसी भागात जे रस्ते बनवले जाणार आहेत, त्याचे काही महिन्यांपूर्वी बॅनर लावले मात्र तेच बॅनर आता फाटायची वेळ आली, तरी अजून या कामाचं टेंडरिंग झाली नसल्याची टीका, नाव न घेता शिवसेनेवर केली. दरम्यान खड्डे भरण्याची तरतूद वाढवावी अशी आयुक्तांकडे मागणी केली असून आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. अशी माहिती कल्याण डोंबिवली मधील मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत १०० दलितांचा गाव सोडून तलावाजवळ आश्रय; तातडीने कारवाईचे जिल्हा प्रशासनाला आदेश

मोहम्मद शमीवरील टीकांवर बीसीसीआय म्हणाले….