in

भिवंडीत 113 दिवस उड्डाणपूल वाहतुकीस बंद

अभिजीत हिरे, भिवंडी | भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपूलाच्या कामास पालिकेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी वाहतूक विभागाने तब्बल 113 दिवस उड्डाणपूल बंद राहणार असल्याची अधिसूचना काढली आहे.

भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाली असताना त्याच्या दुरुस्तीसाठी मागील कित्येक दिवसांपासून हा उड्डाणपूल अवजड वाहतुकीस बंद होता. नुकताच या उडाणपुलाच्या कामास पालिकेने मंजुरी दिल्यानंतर महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.

उड्डाणपुलाची दुरुस्ती होत असताना संपूर्ण उड्डाणपूल चार महिन्यासाठी वाहतुकी करीता बंद राहणार असल्याने शहरातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर प्रतिभा पाटील यांनी केले आहे.

शहरातील अवजड वाहतूक पूर्ण बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून त्या मार्गांचा अवलंब वाहन चालकांनी करावा असे आवाहन वाहतूक विभागा तर्फे राजेंद्र मायने यांनी केले आहे.त्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी 11 ऑक्टोबर ते 31 जानेवारी असा तब्बल 113 दिवस उड्डाणपूल बंद राहणार असल्याची अधिसूचना काढली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोट्यवधीच्या लालसेतून वेगवेगळ्या घटनेत दोन ‘वसंत’ची हत्या

रायगडात पर्यटनाच्या निमित्ताने येऊन चोरी करायचे, दोघांच्या आवळल्या मुसक्या