in

अफगाणिस्तानातून १२९ प्रवाशी सुखरूप भारतात…

अफगाणिस्तानातील काबुल येथून 129 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान AI244 दिल्लीत उतरलं आहे. अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाची सुरक्षा आणि बोर्डिंग प्रक्रिया सुरू होती. विमान आज रात्री प्रवाशांनी खचाखच भरुन दिल्लीला परत येईल अशी माहिती सूत्रांनी दिली होती. अफगाणिस्तानातील काबुल येथून 129 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान सुरक्षित दिल्लीला पोहचले आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी देश सोडला आहे.अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडल्यानंतर ताजिकिस्तानातात गेले आहेत.अफगाणिस्तान सरकारने इस्लामिक दहशतवाद्यांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर तालिबान राजवटीत मुल्ला अब्दुल घनी बरदार अफगाणिस्तानचे नवे अध्यक्ष असतील.

अफगाणिस्तानचे नागरिक असलेले अनेक विद्यार्थी भारतातील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थी राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये शिक्षण घेत आहेत. इथला विद्यार्थी अली असगर यानं म्हटलं की, “मी अफगाणिस्तानातील अल्पसंख्य समाजातील असून बामयन प्रांतातून येतो. हा प्रांत आधी खूपच शांत आणि सुरक्षित भाग होता. पण आज मी ऐकलंय की तालिबान्यांनी आमच्या प्रांतावर नियंत्रण मिळवलंय. मला आमच्या अल्पसंख्य समाजाच्या आणि महिलांच्या भविष्याची खूपच काळजी वाटते आहे”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Taliban takeover afganistan |अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी देश सोडला

अफगाणिस्तानच्या परिस्थितीला बिडेन जबाबदार -डोनाल्ड ट्रम्प