in ,

गुजरातमध्ये 12 वीच्या परीक्षा रद्द


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या. त्या पाठोपाठ आता गुजरात सरकारने ही १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच मध्य प्रदेश सरकारही १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या. राज्यातही १२ वीच्या एचएससी बोर्डाच्या परिक्षेबाबत आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सोमवारी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्त्वाचे सांगत १२ वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर लगेच गुजरात सरकारनेही १२ वीच्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातमध्येही १२ वी च्या परीक्षा रद्द होणार असे चर्चेला उधाण आले. याबाबत अधिकृत निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनता संवादमध्ये म्हटले होते की, १२ वीच्या परिक्षेबाबत केंद्र सरकारने सर्व बोर्डाबाबत एकच निकष ठेवून निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली होती. परंतु केंद्राने केवळ सीबीएसई बोर्डाबाबत निर्णय घेतला. राज्य सरकार १२ वीच्या परिक्षेबाबत नक्की काय निर्णय घेते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sushant Singh Rajput | सुशांतला ड्रग्ज पुरवणारा हरीश खान एनसीबीच्या जाळ्यात

YouTubers | प्रसिद्ध युट्यूबर ‘जीतू-जान’ला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक