दौंड – विनोद गायकवाड | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दौंड तालुक्यातील वडगावबांडे या गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या नराधम बापाला यवत पोलिसांनी अटक केली आहे.,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी ही 13 वर्षाची अल्पवयीन असून ती मूकबधिर आहे.पीडित मुलीची आई मजुरी काम करते.पीडित मुलीची आई मजुरी काम करण्यासाठी गेली असता घरी कोणी नसल्याचा फायदा घेत या नराधम बापाने पीडित मुलीवर बलात्कार केला,पीडित मुलीची आई संध्याकाळी कामावरून घरी आली असता तिने दरवाजा उघडल्यावर मुलीचा बाप पोटच्या मुलीवरच अत्याचार करत असल्याचे दिसून आल्याने आईने आरडाओरडा करीत यवत पोलीस स्टेशन गाठले.आईच्या फिर्यादी नुसार नराधम बापावर पोस्को अंतर्गत तसेच कलम 376 नुसार यवत पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,नराधम बापास यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून याबाबत अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहे.
Comments
Loading…