in

बुलडाण्यातील ‘या’ छोट्याशा गावात एकाच दिवशी १५५ कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव इथं एकाच दिवशी तब्बल १५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगावात पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. तिथूनच कोरोनाची सुरुवात गावामध्ये झाली असल्याचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळपासूनच गावामध्ये आरोग्य पथक, पोलीस, महसूल यंत्रणा तैनात झाल्या असून आरोग्य विभागाने गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू केलं आहे. प्रशासनामार्फत गाव कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आलं आहे.

झाडेगाव हे छोटंसं गाव आहे. गावात कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्यानं निगेटिव्ह असलेल्यांना विलगीकरणात ठेवावं, असा नवीन आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना संसर्गाची शक्यता आहे. त्यामुळे सर्वेक्षणाअंती नागरिकांची लक्षणे पाहता निगेटिव्ह असलेल्या सर्वांना शाळेतील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाडेगावसह तालुक्याचा आढावा घेतला.

झाडेगाव इथं पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. यानंतर दोन महिला पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर गावात सर्दी आणि तापाची भयंकर साथ आली. सर्व लोकांनी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. ही लक्षणे पाहता १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी गावात आरोग्य विभागामार्फत तपासणी शिबिर घेण्यात आलं. त्यामध्ये २१३ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यातील १४१ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर १४ जण अगोदरचे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या गावात आता कोरोना रुग्णांची संख्या १५५ झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिटफंड व्यावसायिक आनंद उनवणे खून प्रकरण; दीड वर्षांपूर्वी कामावरून काढलेल्या कामगाराने केला खून

Farmers Protest | आता चार नाही, 40 लाख ट्रॅक्टर येणार