in

कानपूरमध्ये जेसीबी-बसच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू

कानपूर येथे जेसीबी आणि बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण हे गंभीर जखमी झाले आहेत. कानपूर महानगर परिसरातील सचेडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील किसान नगर नदीजवळ हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, जागीच बसमधील १२ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला.

कानपूर येथील किसाननगर नदीजवळ जेसीबी आणि भरधाव बसमध्ये भीषण अपघात झाला. या वेळी बसमध्ये असलेल्या प्रवाशी हे गंभीर जखमी झाले. तर १२ पेक्षा अधिक प्रवाश्यांचा जागेवरच मृत्यू झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. या ठिकाणी बचाव कार्य हे युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनकोंडी झाली होती. तर काही किलोमीटर पर्यंत वाहनांची लाईन लागली होती.

कानपूरमध्ये झालेला ही दुर्घटना अत्यंत दु:खद अशी आहे. या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. तसेच जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी कामना करतो. असे ट्वीट करुन पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’

राम खांडेकर यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन