in

राजगडावरुन पडून 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क

वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडावरुन एका १९ वर्षीय तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्ले राजगडावर १६ लोकांचा एक ग्रुप आला होता. दरीतून पडलेला मुलगा जागीच ठार झाला आहे.

मृत तरुणाचे नाव अनुराग अनिल राक्षेर (१९) असून तो मुंबई भायखळा येथील रहिवासी आहे. या युवकाचा दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला आहे.किल्ले राजगडावरील पद्मावती माचीवरील गुंजवण्याच्या बाजूने सकाळी सातच्या दरम्यान सुर्योदयाच्या वेळी सेल्फी काढत असताना हातातील पॉवरबॅंक खाली पडली असता ती पॉवर बॅंक काढण्यासाठी गेला, त्यावेळी तोल जाऊन हा तरुण किल्ल्याच्या तटावरुन खाली कोसळला.

साधारण एक हजार फूट खोल दरीत हा युवक कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणास दरीतून बाहेर काढून पोलिसांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविला. याप्रकरणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंदुंबर आडवाल अभय साळुंखे अधिक तपास करीत आहेत. आजकाल गड किल्ल्यावर जाणाऱ्या ट्रेकर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, या प्रकरणानंतर त्यांच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्न उत्पन्न होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंजाबच्या विद्यार्थ्यांचा वापर दहशतवादासाठी… पुलवामातील सोहेलकडून माहिती

दिंडोशी उत्सव प्रकरण: गृहमंत्रालयाच्या आदेशाची पायमल्ली