in

सांगलीत शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू , घटनास्थळी आक्रोश

तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून शौर्य संजय मस्के वय-6 वर्षे रा.आरवडे ता.तासगाव व ऐश्वर्या आप्पासो आवटी वय-8 वर्षे रा.माधवनगर या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

आरवडे-गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे आपल्या घराबाहेर शौर्य व ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खेळत होती. सायंकाळी 3 च्या दरम्यान दोघेही दिसेनात म्हणून कुटुंबीयांनी आसपासच्या घरामध्ये शोधायला सुरवात केली.मात्र ते दोघे सापडले नाहीत.त्यानंतर घरामागे असणाऱ्या शेततळ्याकडे शोधायला गेले असता शेततळ्यावर मोबाईल दिसला. पाण्यामध्ये घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करत तरुणांनी पाण्यात उड्या टाकल्या असता शेततळ्याच्या तळभागात दोघे सापडले.

तात्काळ त्यांना पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.यापैकी ऐश्वर्या ही माधवनगर येथील नातेवाईकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती.घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणार होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दहिसरमध्ये चार घर कोसळल्याची घटना; एकाचा मृत्यू,लहान मुलांचा मृत्यू

जालन्यात खड्ड्यामध्ये बुडून तीन बालकांचा मृत्यू