in

राज्यातील पोलिसांसाठी 2 लाख हक्काची घरं उभारणार

महाराष्ट्र पोलिसांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकार पोलिसांसाठी 2 लाख हक्काची घरं उभारणार आहे. नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत असून त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले जाणार आहे.राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यावर चर्चा झाली. यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत आहे. गृह आणि गृहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले जाणार आहे. तशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

तीन टप्प्यात धोरणाचे प्रारूप

सद्यस्थितीत राज्यातील दीड लाख पोलिस हक्काच्या घरापासून वंचित आहेत. त्याना घरं मिळवून द्यायची असल्यास तेवढ्या मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठीच शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म अशा तीन टप्प्यात या धोरणाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच पोलिसांना सेवा बजावताना लागणारी सेवा निवासस्थाने आणि निवृत्तीनंतर लागणारी मालकी हक्काची निवासस्थाने अशी दुहेरी गरज लक्षात घेऊनच या योजनेचे अंतिम स्वरूप तयार करण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईसह कोकणात पुढचे 5 दिवस महत्त्वाचे

सांगलीत विहिरीत मृतदेह सापडला