in

Maharashtra Corona | राज्यात २ हजार ७४० नवीन कोरोनाबाधित

राज्यात आज दिवसभरात ३ हजार २३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, २ हजार ७४० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, २७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आज रोजी एकूण ४९,८८० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज दिवसभरात ३ हजार २३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६३,०९,०२१ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे.आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,००,६१७ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १३८१६९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC Exam | राज्यसेवा मुख्य परीक्षा ४, ५ आणि ६ डिसेंबरला होणार

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; ‘स्वरभास्कर’ कार्यक्रमाने गणेशभक्त झाले मंत्रमुग्ध