in

20 वर्षीय महिला नक्षलीचे आत्मसमर्पण; 2 लाखाचा होता इनाम

गडचिरोलीच्या CRPF उपमहानिरीक्षकांपुढे एका 20 वर्षीय महिला नक्षलीचे आत्मसमर्पण केले आहे. या महिला नक्षलीवर 2 लाखाचा इनाम होता. दरम्यान आज या महिला नक्षलीला गडचिरोली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत नक्षल्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल नेत्यांनी आजवर आत्मसमर्पण केलेले आहे. याच मालिकेत २ लाख रुपये बक्षीस असलेली करीष्मा ऊर्फ गंगा ऊर्फ सविता अजय नरोठी हीने सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक मानस रंजन यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. आज तीचे गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडे रीतसर हस्तांतरण केले गेले.

करीष्मा ऊर्फ गंगा ऊर्फ सविता अजय नरोठी वय २० वर्ष रा. पुसगुट्टा पोस्टे बेटीया त पाखांजूर जिल्हा कांकेर (छ.ग.) ही चातगाव दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ०४ गुन्हे दाखल असुन शासनाने ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

 २०१९ ते २०२१ सालामध्ये एकुण ३८ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०३ उपकमांडर, २८ सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Navneet Rana | खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणांची सर्वोच्च न्यायालयात धाव

वर्ध्यात रेमेडिसिव्हीर उत्पादक जेनेटिक लाईफ सायन्सेसला राजेंद्र शिंगणेची भेट