in

मैत्रिणीने नकार दिला म्हणून तरुण आत्महत्या करण्यासाठी टेरेसवर चढला

20 वर्षांच्या प्रेमवीर तरुणाला सतर्क पोलिसांनी दिले जीवदान

संजय देसाई, सांगली
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये सहा महिन्यांच्या मैत्रीतुन एका तरूणाचं त्याच्या मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम जडलं. पण तीने नकार दिला म्हणून रागाच्या भरात त्याने राहत्या अपार्टमेंटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी प्रसंगावधान राखून, त्याला बोलण्यात गुंगवून हे पाऊल उचलण्यापासून रोखत त्याला जीवदान दिले.

पुढे या प्रेमवेड्या तरुणाला पोलीस ठाण्यात आणले आणि त्याचे समुपदेशन केले. आई-वडिलांनी अश्रू ढाळत पोलीसांचे आभार मानले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशातील रेल्वे स्थानकांची विक्री करून खासगीकरण करण्यात केंद्राला सर्वाधिक रस, शरद पवारांचा मोदींवर घणाघात

मुंबईमध्ये कोरोना संख्येत पुन्हा वाढ