in

सायनमधून २१ कोटींची हेरॉईन जप्त; महिला तस्करला अटक

मुंबईत ठिकठिकाणी छापा टाकून एनसीबी मोठ्या प्रमाणात ट्रक्स जप्त करत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सायन परिसरात काल, मंगळवारी रात्री मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सायनमधून तब्बल २१ कोटींची हेरॉईन जप्त केली असून यामध्ये एका महिला ड्रग्ज पेडलरला गजाआड करण्यात आले आहे.

काल, मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी घाटकोपर पथकाने सायन परिसरात छापा टाकला. यावेळी सायन परिसरातून ड्रग्ज पेडलर महिलेकडून ७ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची किंमत जवळपास २१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पथकाने ही कारवाई केली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती मुंबई पोलिसांकडून आज दुपारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवी मुंबई महापालिकेने केला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार

दोन मंत्र्याचा मतदार संघ असलेल्या तालुक्यात खड्ड्यांचे साम्राज्य