वाशिम | राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण वाशिम जिल्ह्यातून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील आदिवसी वसतीगृहातील 239 विद्यार्थ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे सध्या वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
विदर्भात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगावमध्ये भावना पब्लिक स्कूल आहे. येथेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे. या वसतीगृहामध्ये एकूण 327 विद्यार्थी आहेत. यामधल्या 239 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या वसतीगृहामध्ये हिंगोली, यवतमाळ, नांदेड, अमरावती इत्यादी जिल्हातील विद्यार्थी या राहत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना कालपासून त्रास जाणवायला लागला. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यामधील 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
Comments
Loading…