in

अवघ्या १८ तासात २५ किमी डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये होणार नोंद!

सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. यासाठी ५०० मजूरांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदार कंपनीचं आणि ५०० कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सोलापूर ते विजापूर दरम्यान ११० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहे. हा रस्ता चौपदरी आहे. पण या मार्गावर २५.५४ किमीचा रस्ता केवळ १८ तासांत तयार करण्याचा विक्रम संबंधित ठेकेदार कंपनीने केला आहे.

हा महामार्ग ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. सोलापूर ते विजापूर हा महामार्ग पूर्व महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. NH५२ म्हणून ओळखला जाणाऱ्या या रस्त्यावर सोलापूर आणि विजापूर दरम्यान अनेक बायपास रस्ते काढले जाणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol and diesel prices Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पाहा आजचे दर

जिलेटीन केपच्या वायरचा स्फोट; शाळकरी मुलगा जखमी