in

Maharashtra Corona | राज्यात २९,६२७ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात १ हजार ६८२ रूग्ण कोरोनामधून बरे झाले, तर १ हजार ५५३ नवीन कोरोनाबाधित आढळले. याचबरोबर, २६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. १ हजार ५५३ नवीन कोरोनाबाधित आढळले. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,८९,९८२ झाली आहे.

राज्यात १ हजार ६८२ रूग्ण कोरोनामधून बरे झाले, आजपर्यंत एकूण ६४,१६,९९८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३८ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २९,६२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.२६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३९७६० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खंडणी मागितल्याचे सिद्ध करावे, राजकारण सोडेन, चित्रा वाघ यांचे विद्या चव्हाणांना खुले आव्हान

शिर्डीतील दर्शन व्यवस्थेत तूर्तास बदल नाही – जिल्हाधिकारी