in

नाशिकमधील साहित्य संमेलनालाआलेले 2 जण कोरोना बाधित

किरण नाईक : नाशिक | गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलनात आज कोरोनाचे दोन रुग्ण सापडले. हे दोन्ही रुग्ण पुण्याहून आले होते. त्यांची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना साहित्य संमेलनात प्रवेश नाकारण्यात असून त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळा भरला आहे. या साहित्य संमेलानासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आहेत. मात्र, प्रत्येकाची कोविड चाचणी करूनच त्यांना आत सोडलं जात आहे. आजही साहित्य संमेलनाला आलेल्यांची तपासणी करून आत सोडले जात असताना दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आले. त्यामुळे या दोघांना संमेलनस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. हे दोघेही पुण्याहून आले होते. त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आले. मात्र, हे दोन रुग्ण आढळल्याने संमेलन स्थळी एकच खळबळ उडाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ahmednagar Leopard Attack ;श्रीरामपूर शहरात भरवस्तीत शिरला बिबट्या, बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जण जखमी

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक