in ,

कृषीपंप वीज धोरण : 3 लाख शेतकऱ्यांनी भरली 312 कोटी रुपयांची थकबाकी

नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून राज्यात 3 लाख 42 हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी 312 कोटी 41 लाख रुपये आजपर्यंत भरले आहे. ऑक्टोबरमध्ये ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलतीही देण्यात आल्या.

या योजनेला वाढता प्रतिसाद मिळत असून या योजनेअंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांकडील सुमारे 15 हजार कोटींची थकबाकी माफ केली आहे. ही योजना तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सप्टेंबर, 2020 अखेरच्या सुधारित मूळ थकबाकीवर 50 टक्के सवलत मिळणार असून व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास 66 टक्के सवलत मिळणार आहे.

पुढील दोन वर्षांत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर 30 टक्के तर तीन वर्षांत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर 2015 नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी 33 टक्के रक्कम त्याच गावच्या वीजपुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. पुढील 3 वर्षात शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

महावितरणची प्रादेशिक विभागनिहाय वसुली :-

  • पुणे : 138 कोटी 91 लाख रुपये
  • कोकण : 95 कोटी 73 लाख रुपये
  • औरंगाबाद : 59 कोटी 37 लाख रुपये
  • नागपूर : 18 कोटी 39 लाख रुपये

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या ८ हजारांचा पल्ला सोडेचना!

बुलेट ट्रेनला विरोध दर्शवणाऱ्या ई. श्रीधरन यांचा औपचारिकरित्या भाजपात प्रवेश