in

Maharashtra Corona | राज्यात ३ हजार ६३६ नवीन कोरोनाबाधित

राज्यात दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज नवीन बाधितांपेक्षा कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६३६ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ५ हजार ९८८ जण कोरोनामधून बरे झाले आहेत. याचबरोबर, ३७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ६३,००,७५५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०९ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८९,८०० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३७८११ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ४७,६९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुलुंडचे फोर्टिस हॉस्पिटल 19 हृदयविकारग्रस्त मुलांना देणार जीवनदान

कोकणाला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; 7 आणि 8 सप्टेंबरला जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता