in

नवरात्रीनिमित्त साकारली 340 चौरस फुट रांगोळी

बालाजी सुरवसे, उस्मानाबाद | उस्मानाबाद शहरातील धाराशिव मर्दिनी मंदीरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त 340 चौरस फुटांची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आलीय.सलग 13 तास मेहनत घेऊन ही रांगोळी साकारली. नवरात्रीनिमित्त महिलांच्या सन्मानार्थ ही रांगोली साकारली गेली आहे.

या रांगोळीसाठी कलायोगी आर्ट्स क्लास उस्मानाबादच्या टीमने सलग 13 तास मेहनत घेऊन ही रांगोळी साकारली. या रांगोळीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर रमाई आंबेडकर झाशीची राणी लक्ष्मीबाई आनंदीबाई जोशी सिंधुताई सपकाळ किरण बेदी कल्पना चावला आणि लहानशी निरागस देवीच्या वेशभूषा असलेली चिमुकली 17 फुट रुंद ,× 20 फुट उंच =340 चौरस फूट आकारात भव्य प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलीय.

रांगोळीसाठी कलायोगीचे संचालक राजकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनात साकारण्यात आली. ही रांगोळी साकारण्यात स्वप्नील कुंभार,दिपराज भोकरे, निकीता लाड,शांकिनी साखरे,जय पंडीत या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत.रांगोळीच्या माध्यमातून नवरात्रीनिमित्त महिलांच्या सन्मानार्थ ही रांगोली साकारली गेली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रोहिणी निनावे यांची ‘चंदेरी लेखणी’, लेखन प्रवासाला पूर्ण झाली 25 वर्षे

७२ तास ७२ शेतकऱ्यांसह भाजपचं अन्नत्याग आंदोलन