in

कोल्हापूरमध्ये कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा ? भाजपचा गंभीर आरोप

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना साहित्य खरेदीत ८८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केला आहे. शासनाच्या पोर्टलवर कमी दराने साहित्य मिळत असताना गडबडीने चढ्या दराने खरेदी करून जनतेच्या लूट करणाऱ्या संबधित अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

जिल्ह्यात कोरोना साहित्याची एकूण खरेदी ८८ कोटींची झाली आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के रकमेचा घोटाळा झाला आहे. भ्रष्टाचाराची रक्कम ३५ कोटी रुपये आहे, असा आरोप निंबाळकर यांनी केला. या मागे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या वरदहस्त असल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यामुळे जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशीचे निवेदन अमित शहा, देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यासंदर्भातील मेल केला आहे, असेही ते म्हणाले.तसेच, राज्य सरकारने जर या प्रकरणाची दखल घेतली नाही; तर प्रसंगी जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन लढाई लढू ,असा इशारा देखील यावेळी निंबाळकर यांनी दिलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अहमदाबादच्या घटनेची पुनरावृत्ती : मोबाइलवर व्हिडीओ तयार करून नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या

रशियात दिसल्या रहस्यमयी रेषा, नासाचे वैज्ञानिकसुद्धा झाले हैराण