देशभरात आज पाच राज्यांमध्ये निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. देशभरात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानात पश्चिम बंगालच्या ३१ जागांसाठी मतदान झालंय. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा यांच्यात थेट आणि अटीतटीचा सामना पहायला मिळाला. आज पश्चिम बंगालच्या 31 जागांसाठी 77.68 टक्के मतदान झालंय.
केरळ विधानसभेच्या सर्व 140 जागांसाठी मतदान झाले. केरळमध्ये 70.04 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी एलडीएफ विरुद्ध काँग्रेस प्रणीत युडीएफ यांच्यात लढत आहे. तामिळनाडूत अण्णाद्रमुक विरुद्ध द्रमुक यांच्यात लढत आहे. तामिळनाडूत 65.11 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी खरा सामना भाजपा विरुद्ध स्टॅलिन असा आहे. तर आसाममध्ये 82.29 टक्के मतदान झाले.
पुद्दुचेरीमधील सर्व 30 जागांसाठी आज मतदान पार पडले. त्यात 10 लाख 4 हजार 507 मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
Comments
Loading…