in

लातूरात एमआयएमला खिंडार, 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे एमआयएमला हा मोठा धक्का मानला जात आहे.

लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल (नाना) यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cruise Drug Case | आर्यन खानचा जेलमधला मुक्काम वाढला

उस्मानाबादेत विजयादशमी निमित्त साकारली 289 चौरस फुट रांगोळी