in ,

साताऱ्यात एसटी आगारातील शिवशाही बस पेटवणारा तरुण ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क

 सातारा आगारात पाच खासगी शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली असून पाचही बस आगीत जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत खासगी मालकांचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एका विक्षिप्त मुलाने ही आग लावल्याचे सांगण्यात येते. पोलसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

आगारात उभ्या असलेल्या पाच शिवशाही बसला अचानक आग लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. आगारात इतर प्रवासीही उपस्थित होते. मात्र, या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. आगीची घटना घडताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. आग आटोक्यात आली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात धुर धुमसत आहे.

शयित मुलगा ताब्यात

सातारा बसस्थानकाच्या आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एक विक्षिप्त मुलगा बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसून सिगारेट ओढत असल्याचे तसेच त्याने बसचे पडदे पेटवल्याचे महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व त्या मुलाला बाहेर काढुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकावर खासगी तत्त्वावरील शिवशाही बसने पेट घेतला. त्याच्या लगतच्या बसमध्ये ही आग पसरली. महामंडळाचे कर्मचारी व नागरिकांनी बसमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तथापि आगीचा भडका उडाला. या आगीमध्ये बस शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच शिवशाही बसेस पेट घेतला.

सातारा बसस्थानकाच्या आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एक विक्षिप्त मुलगा बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसून सिगारेट ओढत असल्याचे तसेच त्याने बसचे पडदे पेटवल्याचे महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व त्या मुलाला बाहेर काढुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कंगना रणौतचं नवे ट्विट वादाच्या भोवऱ्यात, स्वत:ची तुलना केली हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीपशी

MHADA lottery | म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी; जितेंद्र आव्हाड यांनी केली घोषणा