in ,

Maharashtra Corona; राज्यात 54 हजार 535 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रूग्णांपेक्षा कोरोना मुक्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज तब्बल 54 हजार 535 रुग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे राज्यासाठी हि दिलासादायक बातमी आहे.

राज्यात 5 लाख 33 हजार 294 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत 42 हजार 582 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 52 लाख 69 हजार 292 वर पोहोचली आहे. तर आज 54 हजार 535 रुग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 46 हजार 54 हजार 731 वर पोहोचली आहे. आज 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या 78 हजार 857 वर गेली आहे.

मुंबईत 1 हजार 946 नवे कोरोनाबाधित

मुंबईत आज 1 हजार 946 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 37 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्के इतकं आहे. आतापर्यंत एकूण 6 लाख 29 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 38 हजार 649 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर 189 दिवसांवर पोहोचला आहे. कोरोनामुळे मागच्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एक लाख दंड आणि पंचांची थुंकी चाटा; दुसरे लग्न केलेल्या महिलेला जात पंचायतीची शिक्षा

Maratha Reservation; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका