in

मुंबईकरांनो खा, प्या अन् मजा करा…65 ठिकाणी उभारणार स्ट्रीट हब

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेकांना बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विशेषत: मराठी तरुण-तरुणींसाठी मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मितीची महत्वाकांशी प्रकल्प आखण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे रोजगारासोबतच मुंबईकरांची खाण्या-पिण्याची मज्जा होणार आहे.

मुंबईत 65 ठिकाणी स्ट्रीट हब उभारले जाणार आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्ट्रीट हब सुरु असतील. याठिकाणी स्ट्रीट फुडचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.या स्ट्रीट फूडमध्ये पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जाईल. मोदक, पुरणपोळी, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, थालीपीठ यासारख्या पदार्थांचा समावेश असेल. त्यामुळे साहजिकच याठिकाणी मिळणाऱ्या स्ट्रीट फूडच्या माध्यमातून मराठी लोकांना मोठ्याप्रमाणावर रोजगार मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना दिली.

त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे विद्युतनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत असण्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना तीन ते चार रुपये प्रति युनिट या दराने वीज मिळू शकते, असे महापौरांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाचा फैलाव नेमका झाला कुठून? डब्ल्यूएचओच्या पथकालाही झाला नाही उलगडा

Valentines Day | ‘हाच तो संदेश’ होतोय व्हायरल…