in

देशाच्या GDPमध्ये 7.3 टक्क्यांची घसरण

GDP.(https://pixabay.com/)

भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 40 वर्षातील सर्वात खराब प्रदर्शन केले असून 2020-21 या वर्षामध्ये जीडीपी 7.3 टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे . या संबंधी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने आकडेवारी जाहीर केली आहे. 2020-21 सालच्या चौथ्या तिमाहीत जीडीपी 1.6 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत यात काही सुधारणा झाली होती. नंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 0.4 टक्के वृद्धी झाली होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत 1.6 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्या आधीच्या वर्षी म्हणजे 2019-20 साली भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास केवळ 4 टक्क्यांनी झाला होता.

या वर्षी जीडीपीमध्ये जवळपास 8 टक्क्यांची घसरण होईल अशी शक्यता एनएसओने आधीच व्यक्त केली होती. या आधी 1979-80 या आर्थिक वर्षात दुष्काळ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानं देशाच्या जीडीपीमध्ये 5.3 टक्क्यांची घसरण झाली होती. आता त्यापेक्षाही अधिक म्हणजे 7.3 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीस यांचा ताफा

राज्यात यंदा पडणार ‘एवढा’ पाऊस