in

परमबीर सिंह यांची तब्बल 7 तास चौकशी,उद्या पुन्हा चौकशीची शक्यता ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आज तब्बवल 7 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला. उद्या पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते, अशी खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

कोर्टाने फरार म्हणून घोषित केल्यानंतर परमबीर सिंह यांनी आज कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांची गोरेगावातील वसुली प्रकरणाविषयी चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तास चाललेल्या चौकशीनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला.

बिमल अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात करोडोंची वसुली केल्याची तक्रार दाखल केली होती. या आरोपानंतर सिंह यांच्यामागे आता चौकशीचा ससेमीरा लागला आहे. आज तब्बल आठ तास चौकशी झाल्यानंतर तपासात जे सहकार्य करायचे होते ते आम्ही केले आहे आणि करत राहू, अशी प्रतिक्रिया सिंह यांच्या वकिलांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शहीद दौडचे सातारा जिल्ह्यात आगमन

भाजप आमदाराचे स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील वसूलीचा केला भांडाफोड