in

अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात 70 टक्के जलसाठा

पावसाळ्याचे जवळपास 75 दिवस उलटून गेले.दरवर्षी जून,जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असतो. ज्यामुळे राज्यातील धरणाच्या जलसाठयात मोठी वाढ होत असते.परंतू, यंदा मात्र फार समाधान कारण पाऊस न झाल्याने पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अप्पर वर्धा धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा जमा झाला होता. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला. परंतु यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. कारण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र 25 टक्के जलसाठा कमी असून यंदा या धरणात 70 टक्के जलसाठा आहे.

पश्चिम विदर्भात एकूण मोठे 9 पाणी प्रकल्प आहे. या पाणी प्रकल्पाची परिस्थिती अशीच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र या धरणातील जलसाठ्याची टक्केवारी ही कमालीची घटली आहे. दमदार पावसाचे दिवस आता उलटून गेले आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसावर या धरणाची पातळी वाढण्याची प्रतीक्षा आहे.

अप्पर वर्धा अमरावती:69.82%
पुम प्रकल्प यवतमाळ:91:26%
अरुणावती यवतमाळ:87.11%
बेंबळा यवतमाळ :86.75%
काटेपूर्णा अकोला :94:82%
वाण अकोला :73.47%
नळगंगा बुलढाणा :27.77%
पेनटाकळी बुलढाणा :36.30%
खडकपूर्ण बुलढाणा :38.46%

पश्चिम विदर्भातील मोठ्या धरणात एकूण 72.25% जलसाठा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका; नैसर्गिक अधिवासात सोडले

ग्रामपंचायत कार्यालयास ग्रामस्थांनी ठोकलं टाळं