in

मुंबईच्या ब्लॅक आऊटमध्ये 8 जीबीचा डाटा चोरीला

मुंबईत झालेल्या ब्लॅक आऊटमध्ये चीनचा हात असल्याची बातम्या समोर येताच, राज्याच्या गृहमंत्र्यांनी व उर्जामंत्र्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत, या प्रकरणाचा अहवाल सायबर सेलकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली. दरम्यान आता या प्रकरणात 8 जीबीचा डाटा चोरीला गेल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

नितीन राऊत या संदर्भात म्हणाले कि, वीज पुरवठ्यात एससीएडीए युनिट पुरवठा आणि मागणीनुसार लोड संतुलित करते. यामध्ये 8 ट्रोजन हॉर्स मालवेअर चीन, यूके आणि इतर ठिकाणांहून फायरवॉल तोडून दाखल झाल्याची नोंद दिसते आहे. तसेच या ब्लॅक आऊटमध्ये 8 जीबीचा डाटा चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे ऊर्जा विभाग कोणतीही चिनी उपकरणे वापरणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत अचानक विजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगलं होतं. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होतं. परंतु, मुंबईतील ब्लॅक आऊटमध्ये चिनी सायबर हल्ल्याचा हात असल्याची माहिती अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने दिल्यानंतर खळबळ माजली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार ? पंकजा मुंडेंचा सवाल

चिंताजनक; आजची कोरोना रुग्णसंख्या पोहोचली 10 हजारानजीक