in

Maharashtra Corona । महाराष्ट्रात ८ हजार ३९० रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख खालावत चालला आहे. त्यामुळे दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. आज ८ हजार पार रुग्ण बरे होत चालले आहेत. तर नवीन बाधितांची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे राज्यसरकारसह आरोग्य विभागासाठी हि दिलासादायक बाब आहे.

राज्यात ६ हजार ३८८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ हजार ३९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकूण ६१ लाख ७५ हजार १० कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना मात केली आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८६ % एवढे झाले आहे.दुसरीकडे गेल्या २४ तासात राज्यात २०८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे.

४० हजारांहून अधिक कोरोना बाधित

देशात सहा दिवसांनंतर पुन्हा एकदा ४० हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४१ हजार १९५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर ४९० कोरोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याआधी ५ ऑगस्ट रोजी ४४,६४३ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३९,०६९ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४९० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ४४,१९,६२७ लस दिल्या गेल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी मंत्री संजय राठोडांच्या अडचणीत वाढ; शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार

‘कोणतीही लक्षण नसली तरीही कोरोनाची चाचणी करा’