in

पदोन्नतीमधील आरक्षण रद्दच्या विरोधात गडचिरोलीत 80 संघटनांचा एल्गार

सरकारी नोकरीत पदोन्नतीमध्ये मिळणारे आरक्षण राज्य सरकारने रद्द केले. या निर्णयाच्या विरोधात कर्मचारी संघटना संतप्त झाले असून शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील 80 संघटनांनी आक्रोश पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. केंद्र व राज्य सरकार बहुमताच्या जोरावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती व उच्च शिक्षणातील आरक्षण संपुष्टात आणत आहे. सरकारी बँका, कंपन्या, विविध विभागांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करून आरक्षण संपविण्यात येत आहे. नवीन कामगार कायद्यानुसार कामगारांना 8 तासांऐवजी 12 तास काम करावे लागणार आहे. जातीयवाद्यांचे मागासवर्गीयवरील वाढते अत्याचार, शेतकरी विरोधी कायदे आदी प्रकारांमुळे गोरगरीब मागासवर्गीयांची चहूबाजूने मुस्कटदाबी करून त्यांची प्रगती रोखण्याचे कटकारस्थान सुरू आहे, असा आरोप आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलना दरम्यान केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिडकोला घेराव आंदोलन केल्या प्रकरणी २० हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल

Gondia | ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे आंदोलन