in ,

वीज पडून वडिलांचा मृत्यु तर २ वर्षीय चिमुकली जखमी

गोंदिया जिल्ह्यात विशेषता ग्रामीण भागात धडी मारलेल्या पावसाने गुरूवारी विजेच्या गडागडात सह मुसळधार हजेरी लावली. त्यात सायंकाळी केशोरी परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला होता. गार्डनपूर येथील मिर्जा कुटुंब ही पावसामुळे आपल्या घरिच होते. आपल्या २ वर्षाच्या चिमुकलीला पाऊस दाखवावा म्हणून तिला घेऊन तिचे वडिल अस्ताक बेग मिर्झा हे घराच्या झपरित दरवाज्या जवळ बसले होते. अचानक झालेल्या विजेच्या गड़गड़ातात विज अंगावर पडून अस्ताक बेग मिर्झा यांच्या जागिच मृत्यु झाला तर २ वर्षाच्या फैयजलीन अस्ताक मिर्झा ही सुद्धा जखमी झाली असून विज चमकल्याने तिचे दोन्ही डोळ्याला दिसेनासे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाऊस म्हटले तर एक सूखकर अनुभव म्हटला जातो, मात्र ह्याच कुटुंबाने मिर्जा कुटुंबाची राखरांगोली केल्याने गार्डनपुर गावात हळहळ व्यक्त केल्या जात असून गावात शोककला पसरली आहे. शासनाने त्वरित मिर्जा कुटुंबाला मदत करावी अशी मागणी परिसरात जोर धरत आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोकप्रियतेत मोदींनी जगभरातील नेत्यांना टाकलं मागे

पत्नी,मुलाचा खून करून पसार झालेल्या आबिद शेखचा मृतदेह सापडला