in

प्रभादेवीत गोदामाला भीषण आग

मुंबईतील प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनला आज भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाचे 16 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रभादेवीतील इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनच्या तळ मजला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. एडीओ पवार आणि शिर्केसहीत 12 अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग मोठी आहे. मात्र या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

राज्यात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. शुक्रवारी भांडूपच्या मॉलमध्ये भीषण आग लागली होती. त्यानंतर आज राज्यात तब्बल चार आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, अंबरनाथ, बदलापूर आणि पुण्यात आज आगीच्या घटना घडल्या आहेत. बदलापुरात एका बंद केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. तर अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन्स या उच्चभ्रू सोसायटीत बिल्डरने ठेवलेल्या बांधकाम साहित्याला शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बांधकाम साहित्य जळून खाक झालं. तसेच पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आग लागली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकमध्ये कोरोना नियमांचे तीन-तेरा; भावी पोलीस अधिकाऱ्यांकडून नियमांना हरताळ

कुर्ला परिसरातील झोपडपट्टीमध्ये आग