in ,

आजी सोबात शेतकामासाठी गेलेल्या चिमुकलीचा विज पडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील रामाटोला/काचेवानी येथे आजी सोबात शेतकामासाठी शेतात गेलेल्या ९ वर्षीय चिमुकलीचा विज पडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. सोनू जयराम शहारे वय 9 वर्ष असे मृत पावलेल्या चिमुकली चे नाव आहे.

मृतक सोनू ही आपल्या आजी सोबत जनावरे चारण्यासाठी शेताकडे गेली होती, शेतात आजीला मदत करण्यासाठी गेली असता अचानक विजेच्या कड़कड़ाटासह पावसाला सुरु झाली. दरम्यान विज आंगावर पडल्याने सोनू शहारे ही मुलगी गंभीर रित्या भाजली गेली. तिच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान तिचामृत्यु झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘द ग्रेट खली’च्या आई यांचे दीर्घ आजाराने निधन

‘मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण शिवसेना सरनाईकांच्या पाठिशी’