लोकशाही न्यूज नेटवर्क | संदीप गायकवाड
वसई – विरार महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार क्षितीज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे.
बहुजन विकास आघाडीचे युवा नेते आणि आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख आज दुपारी 1 वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व संपर्क प्रमुख रवींद्र पाठक उपस्थित असणार आहेत.
दरम्यान पंकज देशमुख यांच्यासोबत वसई तालुक्यातील इतर समाजातील 4 प्रमुख नेते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीआधी बहुजन विकास आघाडीला हा मोठा धक्का असणार आहे.
Comments
Loading…