in

महिन्याभराचा पाऊस पडला दहा दिवसांत

राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच आता पूर्व मोसमी सरींना असलेला जोर आला आहे. मुंबईत यावर्षी पावसाने जून महिन्याची सरासरी पहिल्या १० दिवसांतच टप्पा पार केला आहे. पाऊस दाखल झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ९ जूनला मुंबई उपनगरात २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. तर शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली. शुक्रवारी मात्र तापमान सर्वसाधारण अंशांवर स्थिरावले.

सांताक्रूझ येथे ३०.९ तर, कुलाबा येथे ३०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी घट दिसून आली. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी ५०५ मिलीमीटर आहे; मात्र यंदा १ ते ११ जून, सकाळी ८.३० वाजेपर्यंत उपनगरात ५३४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लाबा येथील नोंदीनुसार फक्त मुंबई शहरातील पावसाची संपूर्ण जून महिन्याची सरासरी ५४०.९ मिलीमीटर इतकी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कांदिवलीत साठलेल्या गटाराच्या पाण्यात करतायत भाजी विक्री

अमेरिकेत ‘कोव्हॅक्सिन’ला तूर्तास मान्यता नाही