in ,

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण : स्कॉर्पिओच्या मालकाचा मृतदेह सापडला, आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणाला वेगळेच प्रकरण मिळाले आहे. ज्या गाडीत ही स्फोटके सापडली, त्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. त्यातच या स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गेल्या शुक्रवारी संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळली होती. तिचा तपास केल्यावर त्यात जिलेटीन आढळले होते. एका टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश-उल हिंदने ही स्फोटके आपण ठेवल्याचा दावा केला होता. नंतर ही गाडी ठाण्यातील मनसुख हिरेन यांची असल्याचे स्पष्ट झाले.

पण आज (5 मार्च) मनसुख हिरेन यांचा मुंब्रा रेतीबंदर खाडीत मृतदेह सापडला. हिरेन हे काल रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. हिरेन यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती ठाण्याच्या पोलीस उपआयुक्तांनी दिली.

सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात
अंबानी यांच्या घराबाहेरील गाडी कोणाची आहे ते, समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे हे तिथे आधी पोहोचले. नंतर क्राइम ब्रॅन्च, स्थानिक पोलीस तिथे पोहोचले. आता तर, वाहन मालकाचा मृएकूणच हे प्रकरण संशयास्पद असल्याने याचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Alert ; राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा चाळीशी पारा जाणार !

Ind vs Eng : ऋषभची ‘सुंदर’ शतकी खेळी; दिवसअखेर भारत 7 बाद 294!