in

भोसते घाटात कोसळली दरड

कोकणात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून मुबई गोवा महामार्गवर दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. मुबई गोवा महामार्ग चोपदरीकरनाच्या अपुऱ्या कामामुळे दरडीचे सत्र सुरूच आहे. कामथे घाटातील दरडी नंतर आज भोसते घाटात दरड कोसळली आहे त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.वाहन चालक यांनी स्वतःहून दरड बाजूला केल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.

दिवसेंदिवस कोसळणाऱ्या दरडी मुळे मुबई गोवा महामार्ग ठप्प होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा, आंबोली, करूळ, फोंडा घाट अशा घाटामध्ये वारंवार दरडी कोसळत आहेत मात्र दरवर्षी अशा घटना घडत असूनही सार्वजनिक बांधकाम खाते कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याने जनतेत नाराजी आहे. या घाटांची दरवर्षी देखभाल केली जावी आणि प्रवाशावर दुर्दैवी प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशी मागणी होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात, १०० कोंबड्या दगावल्या

नागपूर, ज्ञानेश्वरीनंतर अनिल देशमुख यांच्या वरळीतील निवासस्थानी ईडीची छापेमारी