दंडकारण्यात माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ( DRDO) अत्याधुनिक ड्रोन रविवारी अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. अत्याधुनिक तंञज्ञानाने सुसज्ज मोठया आकाराचा ड्रोन छत्तीसगडच्या माओवादप्रभावीत जगदलपुरला पाठवण्यात आला. डीआरडीओच्या ताब्यात असलेल्या या ड्रोनची चाचणी सुरु होती.
शहराभोवती एक फेरी मारून जगदलपुरच्या विमानतळावर लँडिंग करताना हा ड्रोन धावपट्टीवर न उतरता एका भिंतीवर जाऊन आदळला. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे. इतक्या अत्याधुनिक ड्रोनचा असा अपघात झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जगदलपूर विमानतळाच्या भिंतीवर आदळल्यामुळे या ड्रोनचे मोठे नुकसान झाले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की भिंतही तुटली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी ड्रोनचे अवशेष एका गाडीवर लादून पुन्हा विमानतळावर आणले. या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Comments
Loading…