in

सामाजिक बांधिलकी जपणारा जय हिंद दुर्गोत्सव मंडळाचा अनोखा नवरात्रोत्सव

संजय राठोड
यवतमाळचे दुर्गोत्सव मंडळ देशात प्रसिद्घ आहे. या मंडळाच्या वतीने यंदा कोविड लसीकरण शिबिरा आयोजित केले आहे. याशिवाय रक्तदान शिबिर व वृक्षारोपणही केले जाणार आहे. या बाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते पवन अराठे म्हणाले, “नवरात्रीच्या निमीत्ताने दुर्गोत्सव मंडळाने आज लसीकरण शिबिर आयेजित केले आहे. आता पर्यंत साधारण ३०० लोकांचे लसीकरण झाले असून अजून १०० जणानंचे लसीकरण होईल.

नागरीकांचा प्रतिसाद बघता आम्ही पुढील एक-दोन दिवस हे शिबिर चालू ठेवण्याचा निर्णय घेणार आहोत.”
यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. मंडळाच्या वतीने यापूर्वी शेतकरी विधवांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले होते. यंदाही शेतकरी विधवांना सामाजिक बांधिलकी जोपासून मदत केली जाणार आहे. “आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. गेल्या काही वर्षांत आमच्याकडे जी धनराशी जमा होते, त्यातून आम्ही आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना शिलाई मशीनचे वाटप केले होते. यंदा आम्ही आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी हा निधी देणार आहोत.”अराठेंनी सांगीतले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BIGGBOSS | बिगबॉस फेम हभप शिवलीला पाटील यांच्या कीर्तन आयोजकांवर गुन्हा

ED ने जप्त केलेल्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी