in

आमिर खान आणि किरण राव सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा आले एकत्र!

सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची पूर्व-पत्नी व दिग्दर्शिका किरण राव ही पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्रात येत असून. तिच्या चित्रपटाची निर्मिती खुद्द आमिर खान करणार आहे.

13 जुलै 2021 रोजी आमिर व किरण यांनी, “15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं.” असं म्हणून आपल्या घटस्फोटाची घोषणा केली होती.

ह्यापूर्वी किरणने 2010 मध्ये ‘धोबीघाट’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या चित्रपटाची निर्मितीही आमिर खाननेच केली होती.

8 जानेवारीपासूनच किरण दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमाचे शूटिंग महाराष्ट्रातील विविध भागात सुरू झाले आहे. या चित्रपटाचे लेखन बिप्लव गोस्वामी यांनी केले असुन पटकथा स्नेहा देसाई यांनी लिहिली आहे. अमिताभ भट्टाचार्य ह्यांनी लिहीलेली व राम संपत यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चित्रपटात असणार आहेत.

‘ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर-किरणची ही जोडी वैय्यक्तिक आयूष्यातसूद्धा पुन्हा एकत्र येतील का?’ असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आदित्य ठाकरेंचा अजित पवारांनी ‘मुख्यमंत्री’ असा केला उल्लेख!

Virat Kohli ; विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदाचा दिला राजीनामा, ट्विटरवर काय म्हणाला विराट?