लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्ह्यात अर्धवट जळालेल्या तरुणाचं शव आढळ्यानं खळबळ उडाली आहे. शुभम फुटाणे असं मृत तरुणाचं नाव आहे. 16 जानेवारीला शुभमचं 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा मेसेज त्याच्या कुटुंबियांना आला होता.
शेवटी 28 दिवसांनंतर शुभमचा मृतदेह घुग्गुस शहरातच रस्त्याच्या कडेला आढळला. नोव्हेंबर महिन्यात 6 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्नात अटक झालेला आरोपी गणेश पिंपळशेंडे यानेच शुभमची हत्या केल्याचं तपासात समोर आल आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चंद्रपूर पोलीस करत असून जिल्ह्यात गँगवॉर, अपहरण, हत्या यामुळे नागरिक संतप्त झालेत.
Comments
Loading…