in

गडचिरोली जिल्ह्यात आष्टी-आलापल्ली मार्गावर भीषण अपघात , ४ ठार तर १० जखमी

गडचिरोली जिल्ह्यात आष्टी-आलापल्ली मार्गावर भीषण अपघात झाला आहे. एस टी बस आणि महिंद्रा पीकअप या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली असून या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन मजूर रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच मृत्यू पावले या घटनेत तब्बल १० जण गंभीर असून त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर उर्वरित ५ जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची पुढे आली आहे. 

तेलंगाणा राज्यातून मिरची तोडणाऱ्या मजुरांना घेऊन ब्रम्हपुरीकडे जाणारी पिकअप वाहन क्र. टी एस ०४ यु डी ५८४० आणि प्रवाश्यांना घेऊन भंडारा वरून अहेरीकडे येणाऱ्या एसटी बस क्र एम एच ४० वाय ५६०१ या दोन वाहनांमध्ये चौडमपल्ली जवळील चंदनखेडी फाट्यावर समोरासमोर धडक झाल्याने पीकअप वाहनाच्या चालकासह एक मजूर जागीच ठार झाल्याची घटना ऐन होळीच्या दिवशी घडली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवारांनी आपल्या आयुष्यात अनेक मित्र जोडले – जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या उंबरठयावर? प्रशासकीय नियोजनाचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश